STORYMIRROR

Deepali Mathane

Romance

3  

Deepali Mathane

Romance

रिमझिमतं मन

रिमझिमतं मन

1 min
164

रिमझिमतं मन

आज भरूनिया आलं

मन तरसलेल

सुखावलं


दाहकतेच्या स्पर्शाला

लाभली सुख संजीवनी

शितलतेचे पसरूनी

रंग


 इंद्रधनुष्याच्या रंगासवे

मेघ आले दाटूनिया

आनंद वाटूनीया

पसार


सुखाच्या सरींची

रिमझिम धुंद बरसात

फुले परसात

आठवांची


सांज गारवा

प्रीत मोहरून गंधाळला

मनात दरवळला

प्रेमाने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance