भेट ना
भेट ना
गेलीस अशी तू दूर, आठवण रोज येते.
तूझ्याच पाशी सारे विचार, सारी वेळही जाते.
कस आणी काय सांगू तुला, काय चालू आहे मनात.
एक एक पैलू समजतोय, तूझ्या साऱ्या गुनात.
तु नव्हतीस तेव्हा काही नाही, तु आलीस की व्याकुळ झालो.
सोबत केली सावईकर स्वप्नांची, सोबत तूझ्याच आलो.
चुकलोही असेल कधी, रागावलो ही आहे.
शुद्ध बावनकशी सोने, मी कायम तूझ्यात पाहे.
नशीब लाभले मला, आलीस अशी तु आयुष्यात.
सरता सरत नव्हते, भोग सारे दृश्यात.
अचानक झाली भेट, नव्हती काही कल्पना.
भेटलो कितीदा तरी वाटते, कायमची भेट ना.

