STORYMIRROR

Rohit Khamkar

Classics Inspirational

3  

Rohit Khamkar

Classics Inspirational

कंबर कसेल ...

कंबर कसेल ...

1 min
39

आधी होत नव्हतं असं, हल्ली खूप काही विसरतोय.

सर्वांसोबत मलाही जाणवतंय, बरंच वेगळं मी वागतोय.


चिडतो हल्ली खूप, नंतर होतो मनस्ताप.

कोणाचा राग कोणावर काढी, वाढवून घेतो पाप.


सोडून सारं वाईट, मलाही खंबीर व्हायला हवं.

त्या शिवाय का गाठणार, मला माझा आनंदी गावं.


मानव विचारांची स्पर्धा चालू, मिच मोठा दावण्यासाठी.

प्रत्येकाची गोष्ट वेगळी, शमली शासन काठी.


तरीही सामान्य जगतो आहे, सारी स्वप्न होतील पूर्ण.

कलयुग नाचे थै थै उरी, विसरत चाललाय धर्म.


सारं चालू आपल्या जागी, जरी काही बिघडत असेल.

सरते शेवटी मुलगा नवरा भाऊ बाप मी, प्रत्येक संकटा कंबर कसेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics