STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Classics Fantasy

3  

Rohit Khamkar

Tragedy Classics Fantasy

नवरा तो माठ

नवरा तो माठ

1 min
13

परत तुझ्यासाठी तुझ्यावर, तुझ्या कौतुकासाठी लिहावे.

बोलताना सारं डोळे डोळ्यात घालून, हळू हसून लाजताना पहावे.


वागलो कित्येकदा चुकीचा, वरी रुबाबात राही हो हो माझी नाही काही चुकी.

तरी शब्द आला नाही, आडवा उलटा तिरस्कार की बंडखोरी ती मुखी.


बघ पाहता पाहता नातं होतं फक्त एक, झाले मनोमिलनाने कधीचे ते दोन.

मग बायको असो वा माझ्या बाळाची ती आई, प्रत्येक नातं आहे जणू सोन्याचे ते हो होणं.


माझ्या पाठीशी ती उभी, जाणवत असते सतत मला.

तू ही जानशील तर, कळून जाईल सहज सारं समजेल तुला.


साथ सुटणार नाही, जरी असेल मारली नशिबाने गाठ.

सारं उमजणारा बाबा वाटे, न समजणारा नवरा तो माठ.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy