कायम धावायला...
कायम धावायला...

सारे थांबलेत म्हणून थांबलो, गरज काय शर्यतीला.
पुढे जाणाऱ्याला सांगायची गरज नसते, कायम असं धावायला.
हा थोडा वेळ लागेल झालं हवं आहे ते मिळवायला.
थोडीशी शिस्त अन नियम, लागतील मग पाळायला.
सारा खेळ उमजतोय, वेळ लागला सारं कळायला.
पुढे जाणाऱ्याला सांगायची गरज नसते, कायम असं धावायला.
अपेक्षा चांगली ठेवणाऱ्याला, धीर लागतो चांगल वागायला.
साधं सरळ खरं जगणाऱ्याला, कौतुक करायला जग आहे सांगायला.
आपल्या मागे सारे मोकळे, किती वेळ लागतो गर्दी पांगायला.
पुढे जाणाऱ्याला सांगायची गरज नसते, कायम असं धावायला.
हा थोडी शिल्लक कामे, बाकी ती काय करायला.
डबक्यालाही वेळ लागतो, पाणी सारं जिरवायला.
कसला मोह अन माझं, आता हौस नाही मिरवायला.
पुढे जाणाऱ्याला सांगायची गरज नसते, कायम असं धावायला.