विचार पळून जातो ....
विचार पळून जातो ....

तुझं वागणं मला पटतं आवडतं, पण कधी कधी राग येतो.
तू जवळ आलीस की तूच हवी असते, विचार पळून जातो.
हा बाळा रागवतो मी, तुझ्याच साठी तुला.
त्रास मलाही होतो, माझ्याच साठी मला.
तुझ्या सोबत अन विचारात मी, आनंदाचे गाने गातो.
तू जवळ आलीस की तूच हवी असते, विचार पळून जातो.
खेळताना तुझा बाबा, कधी कधी तुला असा हिनवतो.
कधी मी चिडतो, कधी तुला चिडवतो.
हा मी बोललो तुला, अन तुझ्यासाठी बोलणे खातो.
तू जवळ आलीस की तूच हवी असते, विचार पळून जातो.
काय सांगू बाळा मी कायम, तुझ्या सोबत असतो.
तुझ्या मध्ये मी कायम, मलाच तो बघतो.
काय माहीत तू आलीस, मग मी असेच जगतो.
तू जवळ आलीस की तूच हवी असते, विचार पळून जातो.
जगताना आयुष्य मला, बाळा थोडा ताण येतो.
पाहिलं तुला असं की, सारा राग शांत होतो.
सारं काही तूच, साऱ्या जन्मात तुलाच मागतो.
तू जवळ आलीस की तूच हवी असते, विचार पळून जातो.