माझी गोष्ट . . .
माझी गोष्ट . . .

राजा राणीची गोष्ट तू ऐकली असेल, शेवट मला आठवतो काही.
माझ्या गोष्टीत राजकुमारीच सारं, बाकी मला माहीत नाही.
असतील कितीही राक्षस जंतर मंतर, तेवढ्या पुढतं सारं.
सरते शेवटी नित्य जिवणी, राजकुमारीच्या स्वप्नांचच वारं.
आले कितीही संकट, तयार सतत राजा राही.
माझ्या गोष्टीत राजकुमारीच सारं, बाकी मला माहीत नाही.
राणीलाही तिच काळजी, काय होईल बाळाचं.
सामर्थ एवढे पेरले मना, काय टिकेल काळाचं.
पराक्रम कळेल साऱ्यांना, निरोप देतील दिशा दाही.
माझ्या गोष्टीत राजकुमारीच सारं, बाकी मला माहीत नाही.
नियमान सोबत चाल, तूच होशील सर्वश्रेष्ठ.
धर्मासाठी एवढी लढ, जरी होशील धर्मश्रेष्ठ.
कर्तृत्व अन कौतुक तुझे, याची देहा याची डोळा पाही.
माझ्या गोष्टीत राजकुमारीच सारं, बाकी मला माहीत नाही.