चालू आहे खेळ...
चालू आहे खेळ...
विशेष लिहिण्याच्या प्रयत्नात, बसत नाही कसला मेळ.
दर्जा काही सुधारत नाही, चालू आहे तोच खेळ.
सुचलं ते लिहितो, अन दिसलं ते मांडतो.
विचारांशी माझ्या मिच, कित्येक वेळा मग भांडतो.
शेवटी शब्दांच्या समुद्रात, लेखणीला बांधलाय गळ.
दर्जा काही सुधारत नाही, चालू आहे तोच खेळ.
शब्दांना मी अडकवून, विनतोय मी माझ्या भावना.
तरी विचारांचा अर्थ, त्यात काही दिसेना.
परी जोमाने झटतो आहे, हातात आहे बळ.
दर्जा काही सुधारत नाही, चालू आहे तोच खेळ.
कधी बनते कविता, कधी बनवावी लागते.
तूच सांग आता, तू माझ्याशी कशी वागते.
आवड तुझी म्हणून थांबलो, नायतर केव्हाच काढला असता पळ.
दर्जा काही सुधारत नाही, चालू आहे तोच खेळ.
चांगल वाईट, सुखं दुःख, सारं काही आपण मिळून पाहतो.
मी तुझ्या ओढीत अन तू माझ्या ओठी, असे आपण राहतो.
जगताना सोबत कसा गेला, कळला नाही वेळ.
दर्जा काही सुधारत नाही, चालू आहे तोच खेळ.