STORYMIRROR

Dev Rajput

Classics Fantasy Others

4  

Dev Rajput

Classics Fantasy Others

गणित

गणित

1 min
329

वास्तविक पण गमतीशीर कविता


काय ठेवावं न काय सोडावं काही सूचना..


प्रेमा वर लिहावं म्हणलो काही पण काहीच सूच ना.. 

बिघाड लेलं आयुष्याच गणित काही सुटना...


काय ठेवावं न काय सोडावं काही काहीच सूच ना..


गणिताची मात्र कमाल असते

त्याला कुणाचीच तमा नसते..

कसलं आलंय माणसशास्त्र न कसलं आलंय समाज शास्त्र..

जो चुकला तो चुकला ..

उरतो फक्त चुकीला पात्र..


काय ठेवावं न काय सोडावं काही काहीच सुच ना..


प्रेमचा पुस्तक अर्थ शास्त्रात बदललय..

तारखेच्या गणिताने वाणिज्य संघटन पण हादरलय...


काय ठेवावं न काय सोडावं काही काहीच सुच ना..


प्रेम पत्र आता येस पी च पत्र वाटू लागलय..

इ यम आई च्या तारखेने रुसू रुसू लागलंय..


खरंच प्रेमा वर लिहावं म्हणलो काही पण काही काहीच सूचना..


प्रेम म्हणे जगायला शिकवितो..

पण गणित मात्र नाचायला पण शिकवितो..

प्रेमाच च झालं पारायण..

इकोच ठरला खरा नारायण..


काय ठेवावं न काय सोडावं काय कायच सुच ना..


जमा खर्चाच्या या जीवनात प्रेमाच झालाय उदासीन वायु..

प्रिये तुझ्या त्या आठवणी ना सांग बरं मी कसा सारू..


काय ठेवावं न काय सोडावं काय कायच सुच ना..


प्रेम करायला जिगर लागत..

आणि गणित सोडवायला एक फिगर लागतं..

आठविणींचा आता झाला इतिहास.. 

भूगोला वर उरलाय फक्त नि फ़क्त गणिताचा ध्यास..


गणिता पलीकडं खरच काही दिसेना..

प्रेमा वर लिहावं म्हणलो काही..

पण खरं.. खरच काही सुच ना...

समजून घे..


Rate this content
Log in

More marathi poem from Dev Rajput

Similar marathi poem from Classics