प्रेम हे
प्रेम हे
खरे प्रेम हे दुर्मिळ गडे
तरीही वाटे हवे मला ते
खरे प्रेम हे मिळविणे अवघड ही
तरीही वाटे हवे मला ते
खरे प्रेम हे टिकविणे अवघडही
तरीही वाटे हवे मला ते
खरे प्रेम आयुष्यातील परीस असे
पण ना मिळाल्यास स्वप्नवत भासे
खर प्रेम निस्वार्थी असे
अपेक्षा त्यात कशा चीच नसे
खरे प्रेम हे अबोल असे
प्रत्येकास ते ओळखण्याची दृष्टी नसे
खरे प्रेम मिळण्यास ही भाग्य लागते
जतन करण्यास ही धैर्य लागते

