STORYMIRROR

Arjun Munde

Inspirational

3  

Arjun Munde

Inspirational

साहेबांचे कार्य

साहेबांचे कार्य

1 min
213

पहिली माझी ओवी गं,

गोपीनाथ मुंडे साहेबांना

समाजाच्या विकासाच्या

थोर त्यांच्या कार्याला.


 दुसरी माझी ओवी गं,

महान मुंडे साहेबांना

गोरगरिबांसाठी त्यांनी

झुणका भाकर केंद्र स्थापिला.


तिसरी माझी ओवी गं,

त्यांच्या रचनात्मक बदलाला

मुंबईतील झोपडपट्टी

पूनर्विकास योजनेला.


चौथी माझी ओवी गं,

त्यांच्या थोर कल्पनेला

जिजामाता महिला आधार विमा योजनेला,

बेघरांना घरासाठी गृह योजना प्रकल्प राबविला.


पाचवी माझी ओवी गं,

त्यांच्या सूज्ञ विचाराला

शेतकऱ्यांसाठी बळीराजा संरक्षण विमा त्यांनी बनविला.


सहावी माझी ओवी गं,

समाजाच्या साखरसम्राटाला

अनेक गोरगरिबांसाठी

साखर कारखाने निर्मिला करमाळा कुकडी प्रकल्प राबविला.


सातवी माझी ओवी गं,

त्यांच्या दूरदृष्टी कार्याला

कृष्णा खोरे प्रकल्पातून

पैसा त्यांनी उभा केला.


आठवी माझी ओवी गं,

समाजाच्या कैवारीला

देशाच्या कानाकोपऱ्यात

वंजारी समाजाचा इतिहास

त्यांनी घडविला.


नववी माझी ओवी गं,

त्यांच्या अध्यात्मिक कार्याला

वारकरी संप्रदायासाठी

नाना योजना राबविल्या.


दहावी माझी ओवी गं,

त्यांच्या समाजसुधारणेला

कुप्रसिद्ध गुंडांना त्यांनी

 कंठस्नान दिधला,

गुन्हेगारीकरणावर अंकुश लाविला.


पुढची माझी ओवी गं,

उसं तोंड कामगार नेत्याला

त्यांच्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला,


पुढची माझी ओवी गं,

गोपीनाथ मुंडे साहेबांना,

औरंगाबाद ल

प्रोझोन मॉल वर प्रोझोन ट्रेंड सेंटरचा पाया त्यांनी रचला.


पुढची माझी ओवी गं,

त्यांच्या सहकार्य वृत्तीला

गीतकार जगदीश खेबुडकर यांना

संत ज्ञानेश्वर पुरस्कार दिधला.


वसा तयांचा पंकजा ताईने घेतला 

वंजारी समाजाचा नावलौकिक अजरामर जाहला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational