मनाच्या गाभाऱ्यात
मनाच्या गाभाऱ्यात
मनाच्या गाभाऱ्यातं
तुझाचं दीपं तेवतं आहे
मिटवूनी अंधःकारं सारा
तुझेचं चांदणे साठवतं आहे
सुखं-स्वप्नांच्या तेजातं
गाभारा उजळतं आहे
प्रीतफुलांच्या सड्यांनी
मंद-मंद दरवळतं आहे
निजवूनी आसमंतं सारा
सुखाची दीपमाळं शोधतं आहे
मनातीलं बरबटलेल्या खुणा
का कुणासं ठाऊकं मोजतं आहे?
माझ्या विसाव्याचे क्षणं
मनातं पिंगा घालतं आहे
आशेचे दीपं कधी कधी
का असे मालवतं आहे?
नैराश्याच्या तिमिराला मनं
गाभाऱ्या बाहेरचं नेतं आहे
निरागसं प्रीतीचे दीपं माझे
मनातं कडा पहारा देतं आहे.

