श्रावणमास
श्रावणमास
श्रावणमासी येती श्रावणाच्या श्रावणधारा
सांगे आनंद हा सारा नाचे चहूकडे वारा
श्रावणमास करी जगा आनंदी हा फार
श्रावणाच्या सरीसंगे नभ आंदविभोर
सृष्टीमाता ही पहा हिरवा हिरवा शालू ल्याली
वाटे आंनदे तिलाही नवी नवरी मी झाली
श्रावणाच्या पावसाच्या सरीवरी सरी येती
पोरी, बाळी साऱ्या झिम्मा, फुगडी घालती
अंगणात पारिजात सडा शिंपतो फुलांचा
दारी रेखती रांगोळी सडा गाईच्या शेणाचा
पाने, फुले, फळे सारी आनंदे नाचती
आनंद वाटायला साऱ्या सृष्टीला व्यापती
श्रावण घेऊनिया येतो साऱ्या संस्काराचे लेणे
देण्या व्रत, वैकल्यांचे जणू आनंदाचे देणे
श्रावणमास देतो मना आनंदी आनंद
साऱ्या सृष्टीला लावतो सरीवानी सतछंद
श्रावणाच्या सरीसंगे पिके डोलती डोलती
आनंदे एकमेकां गळा मिठीही घालती
श्रावण घेऊनिया आला साऱ्या सृष्टीला या मोद
घाले साद श्रावणसरी घुमे चहुकडे नाद
श्रावणाच्या सरीसंगे जन जन तृप्त झाले
पशू, पक्षी, झाडं, वेली प्रेमे अमृत ही प्याली
गाई, गुरे, वासरे आनंदी फार झाले
नदी, नाले, झरे सारे आनंदी फार झाले
श्रावणाच्या सरीसंगे मनपाखरू हे झाले
मन तृप्त होऊनिया वनझुलाही झुलले
भावभक्तीच्या सुंगधे मास झाला हा पावन
आता किती करू मी या मासाचे गुणगान
साऱ्या साऱ्यांच्या गोडीचा श्रावणमास हा आला
आनंद फार झाला आनंद फार झाला