नारी
नारी
1 min
174
नारी गं नारी
तू जगात आहेस भारी।
माता तू जगजननीं
तू नवनिर्माणाची खाणी।
नवचेतना तू वात्सल्याची
तू अमृत पान्हा बाळाची।
तू आर्या सिंधुसंस्कृतीची
तू भार्या पतीदेवाची।
तू मदनमस्त मर्दाणी
तू शूरवीर गं राणी।
तू प्रचिती संघपणाची
माता तू कुटुंबाची।
तू मैत्रीण जगात भारी
तू भारतीय पवित्र नारी।
तू अभंग तुळस ग दारी
जणू पंढरीची ग वारी।
तू कन्या,माता,भगिनी
तू सोजवळ सुंदर जननी।
तुझ्या हाती आहे दोरी
जगी दिव्य पाळण्याची।
करी तुझ्याच साजे माते
सामर्थ्य जग उद्धरण्याचे
तू भक्ती, शक्ती, आणि मुक्ती
वंदन तुजला स्त्री शक्ती
