आठवणींचा हिंदोळा
आठवणींचा हिंदोळा
या कातर तिन्ही सांजेस
रंग केशरी पसरला क्षितीजास
आठवणींच्या गर्दीत मी मलाच शोधते आज
शोधूनी पुन्हा पुन्हा मी मलाच भेटते आज
किती भाव दाटले गर्दीत पुन्हा ते आज
कोठूनी येतात कसे पसरतात
क्षितिजास नवे हे साज
या कातर तिन्ही सांजेस
मन कातर कातर होते
मग सय मला ती एक
नवी सय देऊनी जाते
या कातर तिन्ही सांजेस
मनी हलतो आठवणींचा हिंदोळा
