आनंदाचा दिपोत्सव
आनंदाचा दिपोत्सव
मातीचा हा दिवा सांगतो उजळून टाका दाही दिशा
सडा, रांगोळीसह, कोपरा उजळू द्या सर्वही दिशा
वसुबारस करू साजरी धेनूला त्या पूजू चला
मनामध्ये ही आण घेऊनी गोरक्षण ते करू चला
धनत्रयोदशी पूजा धन्वंतरीची आरोग्याचा मंत्र जपू सूत्र पाळूनी आरोग्याचे अवघे जीवन आंनदे जपू
अभ्यंग स्नान करू उटण्याचे कडू कारेटे फोडू
वसा घेऊनी प्रेम, वात्सल्याचे एकमेकां हात जोडू
लक्ष्मीपूजना लेकीबाळी पुजू तुमच्या आणि आमच्या
खरी पूजा घडे तेव्हाच गर्भातील कळी कुणी ना खुडे आमच्या
परंपरेचा आला पाडवा पत्नी ओवाळी पतीराजाला कर्तृत्वासह माझ्या पतीचे नाव होऊ दे दाही दिशाला
सौख्याचा दिवा आणि आनंदाची दिवाळी
प्रिय बहिण आपल्या भावाला ओवाळी
आनंदाचा फराळ ,सौख्याचा दीपोत्सव
माझ्या ,तुमच्या,आपल्या साऱ्यांच्या घरचा हा उत्सव
दिवा दिवा उजळत नेऊ एकच दीपमाळ करू
आपण सारे मिळुनी उत्सव आनंदाचा करू

