STORYMIRROR

SHARMILA VALANJU GUDEKAR

Romance Others

3  

SHARMILA VALANJU GUDEKAR

Romance Others

पाऊस

पाऊस

1 min
205

तो आला अन् झाली धुंद सुगंधी माती

तो भिजवत आला सारी सुकलेली नातीगोती

 तो अलगद आला दारी, मन भिजवी रिमझिम सरी

तो भिजवत आला सारे पर्वत आणि हिमगिरी

त्या झेलू चला हो सारे घेऊन हाती गारा

होतील सुखे मग सारे पाहूनी या जलधारा

तो आला घेऊन संगे बीजलीचा तांडव नाच

त्या आम्रवनी चला पाहू मयुराचा सुंदर नाच

ती कोकिळा बघा गाते सुंदर ,सुरील्या सुरात

ही पहा उजाडली पहाट सरूनी मधुर रात

ते पुन्हा बहरले नव्याने जीवन पिऊनी झाडे

लागले बागडू पुन्हा मन हर्षाने पूर्ण वेडे

ते पशु,पक्षी पहा आनंदले अन तृप्तले 

झाले पुन्हा नव्याने हे रान सारे ओले

तो बळीराजा माझा शेतात राबतो फार

ती मुकं जनावरे पहा करती हलका भार

होते पावसाने शेतीची लगबग चालू

ही माता होते नववधू लेऊनी हिरवा शालू

 ती फुलून येते दारी, मोगरा, गुलाब,जाई

सडा प्राजक्ताचा दारी गंध आसमंती जाई

ते भरले तुडूंब जलाने नद्या,नाले,जलाशय

येते भरून हदय आनंदाने घेते लय  

नटून जाते धरती ,आनंदा येतें भरती

ती बहरून येते माता शेते बघा सळसळती

तो आला आला आला हाती गुंफत आपुले हात

मज बिलगुनी सांगे पहा धरतीचा नवा साज


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance