फडकला झेंडा देऊनिया बलिदान
फडकला झेंडा देऊनिया बलिदान
फडकला तिरंगा देऊनिया बलिदान
फडकला तिरंगा देऊनिया बलिदान
लाभले आम्हास भाग्य स्वातंत्र्याचे वरदान
शत्रूच्या वाराला देती सैनिक सत्वर प्रतिकार
प्रत्येक वादळ झेलती जवान शत्रूवर करुनी प्रतिवार
जो जो आला आक्रमणाला तोडूनी दिले इरादे
भारतमातेच्या सुपुत्रांचे नेहमी पक्के वादे
झाली चाळण छातीची ती झेलूनी ते वार
तरीही देती शत्रूला ते कणखरसा प्रतिकार
ऊन,वारा,पाऊस,थंडी वा असो हिम वर्षाव
आमचा सैनिक नेहमी करतो शूरतेचा वर्षाव
जपतो सैनिक भरतमातेला घालूनी डोळ्यांत वाती
भारतमातेच्या शिरपेचात रोवतो रोज माणिक मोती
किती आपले क्रातींकारक,हसत चढले फासावर
किती झाहले भूमीगतही रक्षणा भारतमातेचा पदर
भारतमातेचा झेंडा झळकतो उंच उंच अंबरात
भारतमातेचा अभिमान आमच्या तनामनांत
या मातीचा टिळा लावतो रोज सकाळी भाळी
जवानांच्या समरण व स्वागता लक्ष दिव्यांच्या माळी
फडकला तिरंगा देऊनिया बलिदान
लाभले आम्हास भाग्य स्वातंत्र्याचे वरदान
