अनाथांची माय
अनाथांची माय
लेवून दुःखाचा चांदणशेला
जगी विखुरले सुखाचे मोती
इवलेसे बाळ घेवून हाती
त्यागून सारी संसार नाती
सारून स्वत्वाची काजवे
तेजपुंज झाली जगासाठी
भाजून चितेवर भाकरी
लढे विश्वव्यापी अस्तित्वासाठी
पोटचा गोळा दूर सारुनी
झाली अनाथांची तारणहारी
रणरागिणीच्या रित्या हाती,
परी लक्ष पाळण्याची दोरी
अशिक्षित निराधार होती
गलितगात्रांची अस्सीधरा
सिंधूताई सपकाळ जिच्या
कर्तृत्वाचा वेलू जाई उंच अंबरा
