STORYMIRROR

Ranjana Khedkar

Inspirational

2  

Ranjana Khedkar

Inspirational

क्रांतीज्योती सावित्रीबाई

क्रांतीज्योती सावित्रीबाई

1 min
53

आम्ही सावित्रीबाईच्या लेकी 

शिक्षणाचा वसा नेऊ पुढती 

सावित्रीमाई क्रांतीज्योती सम 

लेखणीतून ज्ञानदीप उजळती 


वदंन करू सर्व सावित्रीबाईंना 

स्त्रीशिक्षणाची पेटवली ज्योत 

घोट गिळूनही मानापमानाचे 

ज्ञानाचा उगवला त्यांनी स्रोत 


ज्योतीबांच्या सोबतीने त्यांनी 

निरक्षरतेचे दूर घालवले अरिष्ट 

अपमान अन शेणाचे गोळे झेलत

पूर्ण केले स्त्री शिक्षणाचे उद्दिष्ट  


रूढी जोखडांचे झुगारून बंध 

सुरु केली पहिली मुलींची शाळा 

निराधार शोषितांचा बनून आधार

 भ्रूणहत्या केशवपनाला घेतला आळा 


आम्ही सावित्रीच्या लेकी शिकाव्या 

म्हणून स्वतहा हाती घेतली लेखणी 

वाळीत टाकले तरी थकली नाही 

परतावले कित्येकदा डोळ्यातले पाणी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational