प्रित फुलं
प्रित फुलं
जडता मनी प्रेमाचा रोग
जीवनास मिळे नवे वळण
आनंदाचे अंतरंगी फुटे धुमारे
नवचैतन्याची होई उधळण
पाखरासम पंख फुटे मग
सुगंधाने गंधित तन मन
वाटे जगी उरावं प्रेम फक्त
विरक्तीचं गळाव आवरण
ना जात ना धर्म प्रेमाला
गरीब श्रीमंतीचा नसे भेद
दोन मनाचे होता मिलन
हरेल मना मनातील खेद
मनी उमलले प्रित फुलं
प्रणयाचा रोमांच सारा
हृदयातील कळेल गुज
न उलगडता शब्दांचा पसारा
डोळ्यातूनच कळेल तुला
भाव कधी ना उलगडणारा
आनंदाचा आणि तृप्तीचा
झरा निरंतर ओसंडणारा

