क्रांती सूर्य ज्योतिबा
क्रांती सूर्य ज्योतिबा
1 min
370
ज्योतिबाने केली भक्ती लेखणीची
निरक्षरतेचे दूर घालवले अरिष्ट
अपमान अन शेणाचे गोळे झेलत
पूर्ण केले स्त्री शिक्षणाचे उद्दिष्ट
दिवा ज्ञानाचा लावून जगती
सावित्रीची साथ सुंदर लाभली
स्त्री शिक्षणाची सांगून महती
मनामनात ज्योत ज्ञानाची पेटली
साध्य केला त्यांनी निश्चय मनीचा
उभारली पहिली मुलींची शाळा
दिला मान मिळवून स्त्री शिक्षणाचा
निरक्षतेला बघा या घातला आळा
दोघांनी मोती उधळले साक्षरतेचे
स्वतहा पदरी झेलले शेणाचे गोळे
स्त्री शिक्षणाची धरली कास अन
जगी पसरले आनंदाचे सोहळे
