रमाबाई आंबेडकर (अष्टाक्षरी )
रमाबाई आंबेडकर (अष्टाक्षरी )
रमाबाई त्यागमूर्ती
वटवृक्ष जीवनाचा
बळ दिले भीमराया
ध्यास स्वप्न पूर्तीचा
मन खंबीर करून
बने आधार घराचा
देई हिंमत भीमास
गंध तिच्या कर्तृत्वाचा
कष्ट करी दिनरात
दिली साथ अनमोल
भार्या लाभली धीराची
उरी वात्सल्य अमोल
लाभे संघर्ष जीवन
लढे एकली संसारी
ढाल भीमाची रमाई
समर्पण अंगिकारी