STORYMIRROR

Prashant Gamare

Inspirational

3  

Prashant Gamare

Inspirational

अगं बाई सासूबाई...।

अगं बाई सासूबाई...।

1 min
218

जुळवताना लेकीचे लग्न,

म्हणतात कशा सासुबाई..?

करा चौकशी कसून पोराची,

नका करू लगीनघाई...!


सगळीकडून त्यांनी अगदी,

केली छाननी माझी खाशी..

घरादाराची घेऊन माहिती,

नोकरीचीही केली चौकशी...!


शेवटी एकदाचा होकार,

दिला मान हलवून,

लेकीकडूनही घेतला,

हिरवा कंदिल लावून...!


लग्नात लेकीला दिला,

आहेर त्यांनी भारी..

मानपान राखत दिली,

विहिणीला पैठणी नऊवारी...!


पाठवण करताना लेकीची,

आले डोळे त्यांचे भरून...

जावयालाही जवळ घेत,

आशीर्वाद दिले गोंजारून...!


मीही त्यांना केले आश्वस्त,

सुखात ठेवीन बायकोला..

पत्नी म्हणून मान देईन,

तुमच्या लाडक्या लेकीला..!


कौतुकाने सांगतात सगळ्यांना,

लेक माझी गुणाची कपिला..

पण त्याहीपेक्षा सरस आहे,

जावई माझा खूपच भला...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational