मैत्री...
मैत्री...


जेव्हा जवळचे होतात पसार,
तेव्हा मित्रच बनतात तारणहार..
संकटेही मानतात अशावेळी हार,
जेव्हा मित्र असतात आधार..!
नुसत्या शब्दानेही घडतात कामे,
कारण त्यात अक्षरे असतात खात्रीची..
एका वाक्यात सांगायचे तर,
हीच खरी ताकद आहे मैत्रीची..!
प्रार्थना आहे एवढी एकच मनाशी,
साथ जशी दिवा आणि वातीची..
आयुष्याच्या शेवटपर्यंत राहू दे,
घट्ट वीण अशीच सुंदर नात्याची..!