तुझ्यासोबत.....
तुझ्यासोबत.....


तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांचा,
मिळतो अजूनही मनाला गारवा..
रुंजी घालत क्षणाक्षणाला,
आठवतो भिरभिरणारा पारवा..!
हळुवार फुंकर घालत प्रेमाने,
घेवून जातो भूतकाळात थेट..
दाखवतो ती जागा खुणेची,
जिथे व्हायची आपली भेट..!
उरलाय तिथे आता निप्षर्ण साग,
दाबत मनातील विरहाची आग..
जपतोय अजूनही आतल्या आत,
ह्रदयभंगाचा गुलाबी डाग..!
नसलीस तू जरी आता सोबत,
आहेत तुझ्यासोबतच्या आठवणी...
येतात उफाळून कधीतरी नेमाने,
मनात जपलेल्या साठवणी...!