आगमन झाले बाप्पाचे
आगमन झाले बाप्पाचे
आगमन माझ्या घरी गणरायाचे
किती सुखानुरुप जाहले..?
सुंदर लंबोदर गजाननाचे,
आज मुखकमल मी पाहिले...!
आरास करुन सजवला मंडप,
काढली अंगणात सुबक रंगावली..
ढोल ताशांच्या गजरात निनादत,
बाप्पांची स्वारी दारी आली...!
करून वंदन पावन मूर्तीला,
घातले साकडे विनायकाला..
कृपादृष्टी ठेव आम्हांवर,
हरोनी ने हरेक संकटाला..!
प्रारंभी विनंती करून हेरंबाला,
दिवस आज हर्षाचा आला..
पदरात देऊन सुख अपरंपार,
गणपती माझा स्थानापन्न झाला..!
भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा,
चंद्र आकाशात अवतरला..
आराध्य मोरेश्वराच्या दर्शनाने,
तो ही मनातून सुखावला...!