STORYMIRROR

Prashant Gamare

Fantasy

3  

Prashant Gamare

Fantasy

उन्मुक्त मोगरा....

उन्मुक्त मोगरा....

1 min
145

बहरला मोगरा दरवळली काया,

मोहक कळ्याही हसल्या गाली..

स्वैर भ्रमराने चुंबन घेताच,

ओठांवर आली किंचित लाली...!


हळुवार स्पर्शाने पुलकित झाली,

रोमरोमांत रेशमी प्रीत संचारली..

मकरंदाचे करुन उगीच बहाणे,

फुलपाखरेही मनात हुंकारली...!


तन-मनाने सृष्टी अवघी उजळली,

कात टाकून नव्याने मोहरली...

बांधून थेट रविकिरणांशी संधान,

सर्वांगातून मनस्वी बावरली...!


बहरलेल्या उन्मुक्त मोगऱ्याने,

केली किमया इतकी न्यारी...

जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी,

मंत्रमुग्ध झाली दुनिया सारी....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy