जगणे राहून गेले
जगणे राहून गेले
अपमानाचे ओझे वाहताना,
मेल्याहून मेल्यासारखे झाले..
लाचारीचे जिणे जगताना,
खरंच जगणे राहून गेले...!
पौर्णिमेच्या चांद रातीला,
तमोगुणांनी दूर नेले...
प्रकाशाची वाट धुंडाळताना,
खरंच चांदणे हरवून गेले...!
रोजचेच संसाराचे रडगाणे,
दुःख चघळत आले..
सुखाच्या क्षणीही आता,
खरंच हसणे विसरून गेले...!
येईल केव्हा काळ यशाचा,
वेध भविष्याचा घेत राहिले...
मन आशेच्या किरणांत न्हाऊन,
खरंच भूतकाळात रमून गेले...!