सोपं नसतं....
सोपं नसतं....
सोपं नसतं इतकं
बोलणं बंद करणं
मनात साठवलेल्या व्यक्तीला
आठवणीतून काढून टाकणं..!
खूप अवघड असतं
गुंतलेल्या भावनांना आवरणं
कोणीतरी सांगतंय म्हणून
व्यक्तीला त्या विसरणं...!
कठीण होऊन बसतं
नातं असलं जपणं
एका विचारात रात्रभर
डोळे मिटून जागणं...!
शेवटी हातात काय उरतं ?
आयुष्यभर मनात झुरणं
व्यतीत केलेल्या क्षणांना
एकांतात रडून आठवणं..!
