आठवण
आठवण
मन हळवे ओले होते,
जेव्हा आठवण तुझी येते...
नकळत मुक्त आसवांना,
हुंदके भरभरून देते..!
अव्यक्त मुक्या भावनांचे,
जेव्हा तरंग ह्रदयात उठते...
मिलनाच्या सुप्त आशेचे,
हळुवार मनात पेव फुटते...!
स्वप्नात छबी तिचीच दिसते,
रात्र काळी उगीचच छळते...
अंतरंगातील इवल्या कप्प्यात,
जखम आणखीच चिघळते...!
तिच्या आठवांच्या गर्दीत,
मन पुन्हा पुन्हा बावरते...
दुरावलेले क्षण आठवून,
मग घ्यावे लागते आवरते...!