आठवतं ना..?
आठवतं ना..?
आठवतं ना..
तुला पाहायला आलो होतो,
पाहिलंस आणि प्रेमात पडलीस
आठवतं ना..
होकाराचं विसरून गेलो पण
फोटो खिशातून काढला नाही
आठवतं ना..
मैत्रिणीचं नाव सांगून फोन केलास
अलगद होकाराचा शब्द दिलास
आठवतं ना..
उंबरठ्याबाहेर न पडलेली तू
मैत्रिणीला घेऊन भेटायला आलीस
आठवतं ना..
उडालेला गोंधळ, रंकाळ्यावरची भेळ,
जुने सोडून तुझा माझा जमलेला मेळ
आठवतं ना..
आईकडे धरलेला माझ्यासाठी हट्ट
उराशी मारलेली पहिली मिठी घट्ट
आठवतं ना..
जिंकलंस घरच्यांना आलीस घरी
मनापासून माझ्या रमलीस संसारी
तुझ्या मोगऱ्याची ओंजळ माझ्या दारी