STORYMIRROR

taravkavya तरव

Classics Inspirational

3  

taravkavya तरव

Classics Inspirational

रहाटगाडगे जगाचे

रहाटगाडगे जगाचे

1 min
11.6K

शांत शहर आणि गल्ली बोळ

विसरले कान आवाज वर्दळीचा

विसरला रस्ता पायवाटेचा

विसरली चाक आवाज हवा भरायचा

सगळं हे अकल्पित आणि अगणित

याआधी वेड्यात काढलं असत भाकीत

दिसतंय जे डोळ्याने घडतंय जे समोर

विश्र्वास बसत नाही मनास सहन होत नाही

कथानक हे जगाच पण बिनधास्त' लढायच

खुप आले संकट अन येत राहतील

माणसंच ती नेहमीप्रमाणे बदलतील

अन नवखी जीवनशैली अवंलबतील

ससेहोलपट झालेले अधिकच कणखर होतील

अन शहाने सवरते अजुन सुधारतील

सामान्य जनाच्या न्यायासाठी कोर्ट कचेर्या वाढतील

आ वासुन आशेने लोक शासनाकडे बघतील

पण वेळच सांगेल कोण कसा देईल न्याय ?

पण आज तरी आम्हास ऊद्याची चिंता नाय

पशुपक्षाप्रमाणे रोजचंच दान टीपणे ठाऊक

आम्ही कुठ लाखोंच्या किराणांचे घाऊक

पण रहाटगाडघ जगाचं चालायचं कुठ थांबायच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics