तुझे वेड लागले
तुझे वेड लागले


आठवावे चरीत्र तुझे की
साठवावे मनात रुप तुझे
भावविश्व हे अगाध तुझे
परी मज आवडते हे बोल तुझे
क्षणात मळभ दुर करणारे
कना कनात बसनारे प्रेम तुझे
मनमनात बसनारे दयाधन तुझे
करुनाकर हे नाम तुझे
तुज विन राहु दुर कसे
नसता समोर तुज आठवु कसे
रुप तुझे लाघवी डोळ्यात साठवु कसे
नकळतच मज लागले हे वेड तुझे
असे अम्रृताहुनी गोड नाम तुझे.
शब्दरुप हे भाव माझे
परी मनी आकांक्षा माझी
गळाभेट व्हावी तुझी
ही वेडी आस ही या मनाची