taravkavya तरव

Others

3  

taravkavya तरव

Others

आई

आई

1 min
236


ना कोणती आशा

ना आहे काही अपेक्षा

निस्सीम प्रेमच काय ते

वाटत राही अक्षरक्षः

ना कळली महती

ना आहे तीची जाण

स्टेटस अन दिखाव्यासाठीच

तिला दिला जातो मान

नसता आहेच ऊपेक्षाची खान

आहेच ती माय माऊली

निरंतर वाहत्या प्रेमाची सरीता

 अन चंद्राची शीतलता

 दु:खावर आधाराची कोमलता

जडनघडन करुन घडवणारी

स्वत:च मारुन ईच्छा

मुलांसाठी अगणित कष्ट करणारी

अन प्रसंगास रणचंडी होऊन

रक्षण करणारी माय माउली

विसर जरी पडला या जनास

जाताच तारुण्याच्या मोहपाशात

तरी सुखासाठी तयाच्या घालवी जन्म

अलिप्त त्या व्रृद्धाश्रमात

पण तरीही आहे प्रेमच रदयात

अन अंखड करुणा तिच्या वागण्यात

काय आहे तिच्या जीवनात

त्याग आणि ममता

अन आपल्याच बछड्याप्रती आत्मीयता

पण का नाही दिसत तिची अगतिकता

की आपलीच आहे सैतानाची मानसिकता‌.


Rate this content
Log in