सत्यवचनी ज्ञानेश्वर...
सत्यवचनी ज्ञानेश्वर...


रुक्मिणीबाई नि विठ्ठलपंत पोटी
संत ज्ञानेश्वर पैठण गावी जन्मले
मुक्ताई, सोपान नि निवृत्तीनाथ
समवेत बालपण आधारात रमले
बहिष्काराचे अग्निदाह सोसत
मुक्ताईचे कधी पाठीराखी झाले
भिंत चालवून भक्तीचे चमत्कार
जगाला शिकवणुकीतून दाखवले
मोठा भाऊ पुण्यवान निवृत्तीनाथ
गुरु मानून भक्तिभाव जागवला
पांडुरंगाचे जपून नाम, सत्यवचनी
अभंगातून विश्वाचा उद्धार केला
विठ्ठलभक्त ईश्वरी अवतार कवी
ज्ञानेश्वरी ग्रंथकार जगी अवतरले
मुक्या प्राण्यास बोलके करणारे
ज्ञानेश्वर थोर, ज्ञानी संत उपजले