फुले
फुले
प्रेमाचे प्रतिक ते गुलाबाचे फूल
मंद सुगंध घ्यावा प्राजक्ताकडून
रात्र चांदणी सुगंधित रातराणी संग
आनंद देणे शिकावे आपण फुलांकडून
जाई, जुई, चमेली, मोगरा देई प्रसन्नता मनाला
करुनी देवाण घेवाण फुलांची आनंद द्यावा घ्यावा
रोग्याच्या मनाची मरगळ दूर करा क्षणात
देऊन गुच्छ फुलांचा, तयास आनंद द्यावा
लाल जास्वंद फूल प्रिय ते गणपतीला
मंगळवारी अन् चतुर्थीला वाहतो आवर्जून
पुजा सजवावी रंगबेरंगी मस्त त्या फुलांनी
संचारेल चैतन्य घरातल्या प्रत्येकाच्या मनातून
शुभ्र चाफा मोगरा वाहतो सोमवारी शंकराला
अभिषेकानंतर सजवलेला छान दिसतो महादेव
मनाजोगी पूजा करुनी लाभे ती शांती
संकटांवर मात कराया साथ असेल देवाधिदेव