वीर बालक
वीर बालक
1 min
19
मी वीर बालक या देशाचा
नव्या युगाच्या तंत्रज्ञानाचा
आहे अभिमान मला खूप
माझ्या छान भारत देशाचा.
आईबाबांनी दिले संस्कार
जोपासतो मी अंगवळणी
अनुभव घेतो मी जनाचे
गुरूजीची ज्ञान शिकवणी.
ज्ञानाने होईन मी शिक्षित
माणूसकी धर्म मी मानीन
परोपकार वृत्ती बाळगीन
गरजुना सदैव मदत करीन.
अभिमान आहे मला देशाचा
सलाम करतो क्रांतीकारांना
ज्यांनी स्वतःची दिली आहुती
देव स्वातंत्र्यासाठी लढतांना.
वीर बालक मी या देशाचा
आहे मला त्याचा स्वाभिमान
तत्पर असेन माझ्या कार्यात
राखीन मी सदा देश अभिमान