STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics

4  

Sanjana Kamat

Classics

स्वप्नातल्या भेटी

स्वप्नातल्या भेटी

1 min
514

आतूर जीव स्वप्नातल्या भेटी,

उजळले मन मिलनांच्या गाठीत.

नवचैतन्याने जीवन बहरल,

स्नेह फुले हिरे,माणिक जडीत


सुंदर सोनेरी उधळत पहाट,

नवीन उत्साहाने तनमन डोलत.

सामंजस्याने संसार वेल फुलवत,

परिसस्पर्श सुखद क्षण पल्लवीत.


रचे विधाता भातुकलीचा खेळ,

गंधाळली कस्तुरी अर्तबाह्य मदनात.

सृष्टीच्या रक्षणा नव बीजे अंकुरित,

सप्तरंगाचा ऋतू प्रेमांकुर गंधात.


जीवलग जाती क्षणात सोडून,

सरता यौवन पानगळ निश्चित.

विरह यातना जन्मांतरीच देणे,

नादा सौख्यभरे आनंद वाटीत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics