निवडुंग
निवडुंग
चोर अवती भोवती
घर माझे त्या वस्तीत
झळे प्रामाणिकपणा
दृष्टी विकृत रंगीत
डावपेच भ्रष्टाचार
लुटे मस्त घरदार
स्वार्थी अभिलाषेपोटी
कापे गळा आविष्कार
रक्त नाती नासलेली
नको पुढे भावबंध
पाय ओढे जीवलग
निवडुंगी स्नेहबंध
दाखवली माणुसकी
म्हणे बकरा कापला
गणेशाच्या खोलीसाठी
हक्का जावई बसला
चोरी देवस्थानी घर
दैत्य दानवी प्रयास
भांडी कौल चोर ऐट
पहा मुर्खा इतिहास
