STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

आवडते शिक्षक

आवडते शिक्षक

1 min
144

परीसस्पर्श पहिला मायबापाचा,

जन्म लाभला आतुल्य मानवाचा.

कळस गाठला तो सुसंस्काराचा,

शोध घेतला पंखातील बळाचा.

आवडते शिक्षक शिदोरी अनुभवाची,

जीवनाची मोल्यवान पायरी खरी.

विविध गुणाचे मोती माळेत गुंफत,

सोनेरी पंखाची कल्पना घेई भरारी.

बालपणाची मैफिल ती आगळी,

माहितच नव्हती राजकारण खेळी.

शोभे बिनधास्त मित्रांची टोळी,

सारेच निरागस मनाने साधी भोळी.

शाळा काॅलेजचा क्षण हळूच सरलेला,

बिनधास्त जगणारा काळ निसटलेला.

शतरंगी सुखद स्मृतीत हरपलेला,

ह्दय कुपीत गंधकोषात दरवळलेला.

परिसस्पर्श गोड सदगुरू कृपेचा,

मिटला मोहमायेचा हिशोब सारा.

निष्पाप देहास मोक्षपदाचा आसरा,

उद्ध्वस्त जीवनास भेटला किनारा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational