STORYMIRROR

Sanjana Kamat

Classics Inspirational

4  

Sanjana Kamat

Classics Inspirational

काव्यसखी

काव्यसखी

1 min
250

काव्यसखी कोहिनूर

रम्यस्वर्ग दिव्यत्वाचे

नभांगणी चमकत

रोमरोम नक्षत्रांचे


मन मेंदू सारीपाट

देशहिता तलवार

अनुभव सोसे घाव

ज्ञानज्योती साक्षात्कार


लिला दातृत्व शिंपत

अलौकिक पखरण

मृदगंध दरवळे

सुख दु:खाचे प्रांगण


धरे कर्तव्याची कास

सुसंकल्प यज्ञकर्म

शांत सृजनाचे बीज

शोधे दातृत्वाचे मर्म


ज्ञानकुंभी भविष्याची

पूर्णत्वाचे अनुबंध

पाठलाग कस्तुरीचा

झुले चैतन्य सुगंध


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics