गोधडी
गोधडी
आज गोधडी हासली
पाहे कचऱा कुंडीत
संसाराची तुरपाई
गेल आयुष्य जोडीत
खाच खळगे संघर्ष
फुलवीत अनुबंध
हुंदकांचा झंझावात
हासत ऋणानुबंध
प्रेम विश्वास निर्मळ
गणगोत संभाळत
घास मोत्यांचा शोधत
दातृत्वात गंधाळत
झिजे चंदनी जीवन
घरकुल पिल्लांसाठी
इच्छा आकांक्षा जाळत
उद्या आधाराची काठी
आधुनिक संसाराला
हौस भारी दिखावट
दोन दिवस वापर
रोज भंगार सावट
आज वेळ अशी माझी
उद्या तुझी असे बारी
विरहाच्या सावलीत
खेळ नियतीचा भारी