शिक्षक
शिक्षक
शिकवतो आम्ही विद्यार्थ्यांना मन लावून,
घडवतो पुढची पिढी कायम तत्पर राहून
विद्यार्थ्यांना देतो आम्ही संस्कार आणि मूल्यशिक्षणाचं बाळकडू,
बालक आणि युवांच्या माध्यमातूनच देश लागेल घडू
गुरु तोच असतो जो दाखवतो शिष्याला जवळचा अन् योग्य रस्ता,
देतो ते ज्ञान जे मिळवण्यासाठी कितीतरी खाव्या लागतात खस्ता
अनुभवातून येतं शहाणपण जे थेट शिकवतो शिक्षक,
जागे झालेत अचानक आजकाल विद्यार्थ्यांच्या बालमनावर रक्षक
शिक्षा द्यायची नाही विद्यार्थ्याला तर तो कसा घडणार?
अलंकार बनण्यासाठी सोनंही आगीतच पडणार
आॅनलाईन,काॅप्या करुन विद्यार्थी होताहेत सरसकट पास,
आजकालच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना लागायला हवा ज्ञानार्जनाचा ध्यास!
