प्रवास
प्रवास
1 min
194
प्रवास माझा क्षणाक्षणाला तुझ्याचसाठी,
मला भासते ध्येय जणू तू विराम पाटी
भेटत नाही हल्ली तूही कधीसारखी,
जन्माच्या जुळतील सखे का अशाच गाठी?
दुर्लक्षून मज काय साधते सांग बरे तू?
उगाच आशा मनात माझ्या तशीच खोटी
रस्त्याला तेथेच उभा तू जिथून गेली,
कधीही ये परतून वाट ही भलीच मोठी