आभास
आभास
पाहून हसतो मीम्स, शेअर करतो रील्स
गाणं म्हणतो 'आय लाइक हाऊ इट फील्स'
नवी पिढी, नवे विचार, नवी संस्कृती, नवे आचार;
'सुखात आहे' म्हणतो जेव्हा झाला तंत्रज्ञानाचा प्रचार
गेम्स, अपडेट, स्टेटस, इमोजी आणि इंटरनेट
काळजाला काळीज जोडलं जातं म्हणे थेट
पासवर्ड नाही लागत भावनांचं वायफाय कनेक्ट व्हायला
संवादाचं ब्ल्यूटूथ पुरेसं असतं आभाळ कवेत घ्यायला
कॉम्प्युटरने घडवली क्रांती, जग केलंय एक
कळायला आपल्याला हवं... हे किती खरं, किती 'फेक'
