STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Others

2  

Somesh Kulkarni

Tragedy Others

भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

1 min
120

दररोज बघावं तिकडं चालतोय फक्त भ्रष्टाचार,

तत्वांची नाही तमा पैसाच झालाय जीवनाचं सार


घेतात हसत हसत अगदी टेबलाखालचं असो वा वरचं,

देशाचं काम चाललंय, जातंय कुठे आपल्या घरचं?


पक्षपाती धोरण राबवलं जातं याच पैशापायी,

चोराला मिळते मुभा न्यायाचं कुठलंही सोयरसुतक नाही


वरपासून खालपर्यंत सगळ्यांना राजकारणाचं बाळकडू मिळतं,

एकाच साच्यातल्या माणसांचं एकमेकांशी चांगलं सूत जुळतं


गौण दर्जाचं काम केलं जातं ठिकठिकाणी,

हात झटकून मोकळे झाल्यावर केली जाते जाहीर पैशांची आणीबाणी


साखळीतल्या सगळ्यांनाच परवडतो करवसुलीचा धंदा,

खोटी साक्ष देणारा जागोजागी सापडतो समर्थक खंदा


भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची जवळ आलीये वेळ,

आता तरी थांबवा हा भ्रष्टाचाराचा लाजिरवाणा खेळ!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy