STORYMIRROR

Somesh Kulkarni

Tragedy Others

3  

Somesh Kulkarni

Tragedy Others

पाण्यासाठी काय पण

पाण्यासाठी काय पण

1 min
164

जवळून बघितलंय लोकांना मी पाण्यासाठी वणवण भटकताना,

पर्वा करत नाहीत लोक भांडणात एकमेकांना हटकताना


पाणी अडवा पाणी जिरवा आम्ही दररोज पाट्या वाचतो,

विधायक गोष्टींपेक्षा बाकीचाच कचरा आमच्या डोक्यात जास्त साचतो


बऱ्याच ठिकाणी आणावं लागतं लांबून चालत जाऊन,

येत नसतं प्रत्येकाच्या घरात पाणी नळ चालू करुन पाहून


प्रत्येक गोष्टीच्या प्रदूषणावर आपण बोलतो सर्रास,

कारखान्यातलं सांडपाणी नदीत सोडतो खास


नद्यांमध्ये स्नान केल्यावर धुतलं जातं पाप,

आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपणच बनतोय आपल्यासाठी शाप


शेतीसाठी पाऊस पडतोच दरवेळी मुबलक असं होत नाही,

पाण्यापेक्षा मोठ्या नसतात समस्या सर्वासामान्यांच्या काही


माणुसकी झाली बंदिस्त बिसलरीच्या दोन घोटात,

चार भिंतींपलीकडंही असते दुनिया सगळेच फिरत नसतात टाय-कोटात!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy