वेदनेला
वेदनेला
देऊन टाक आता आभाळ वेदनेला
होईल घाव मोठा सांभाळ वेदनेला
कुठल्याच भावनेचे नाही मनात ओझे
शमवून रोज नेतो हा काळ वेदनेला
तोडून बंध सारे मी मुक्त होत गेलो
कळले न जोडलेली ही नाळ वेदनेला
झिडकारले जगाने हेटाळले कितीदा
दाबून ठेव अश्रू तू पाळ वेदनेला
पाण्यावरी उसासे आहेत मोतियांचे
शोधीत आत ज्वाला तू जाळ वेदनेला
