STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

शूरवीर राजे संभाजी

शूरवीर राजे संभाजी

1 min
197

शूरवीर संभाजी राजे

युवराज शिवरायांचे

छावा सिंहाचा वीरता

नसानसातून वाहतसे  (१)


आग्र्याहून निसटताना

पेटा-यामधूनी पोबारा

वेषांतर करुनी तयांनी

सुरक्षित ठेवी युवराजा  (२)


गनिमी काव्यांनी मुघलांना

पळता भुई थोडी केले

पराक्रमाला गालबोट 

फितुरीचे कसे लागले?  (३)


बादशहाने आदेश दिधला

धर्मांतराचा वीर संभाजीला

धुडकावुनी लावि त्वरितचि

धर्म प्राणाहूनही प्रिय मला  (४)


 हाल करुनी डोळे काढूनी

छाव्याला मरणयातना देई

परि मानी पराक्रमी संभाजी

धर्मापासूनी ढळला नाही  (५)


मृत्यूलाही जिंकले राजांनी

तिथे ओशाळला मृत्यू

शूर वीराची शोकांतिका

येती आजही नयनी अश्रू  (६)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract